कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह बांधण्यात यावे-- ग्रामस्थ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट यांची संयुक्त मागणी .


  मलकापूर :- आज दिनांक 16.02.2026 ला ग्राम कुंड खुर्द येथील ग्रामस्थ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृहाची निर्मिती व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष अजय प्रभाकर सावळे यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माननीय संतोष शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.   
    याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्राम कुंड खुर्द येथे शासनामार्फत बांधण्यात येत असलेल्या सामाजिक सभागृहाची निर्मिती व्हावी यासाठी आज दिनांक 
16-02-2026 ला माननीय उपविभागीय अधिकारी संतोषराव शिंदे यांना निवेदन देण्यात आले. ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृहाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण कुंड खुर्द येथे समाजाच्या उप योगासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी तसेच मंगल कार्यालयासाठी कोणतीहि मोठी शासकीय वास्तू नाही. ग्राम कुंड खुर्द येथील मुले हे शैक्षणिक दृष्ट्या चांगल्या प्रगती पथावर आहेत. येथील आयुष्यमान राजेश झणके यांचा मुलगा तसेच आयुष्यमान कडू कांबळे यांचा मुलगा शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत. त्यामुळे येथील मुलांना एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. करिता मुलांच्या अभ्यासासाठी आणि समाजाच्या उपयोगासाठी कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृहाची अत्यंत आवश्यकता आहे. त्या अनुषंगानेच आज गावातील सर्व नागरिक आबाल वृद्ध यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट चे सर्व पदाधिकाऱ्यांनी सामाजिक सभागृह कुंड खुर्द येथे बांधण्यात यावे यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. 
     सदर निवेदन देतेवेळी सेवा ट्रस्टचे भीमरावजी नीतोने, रामभाऊ गवई,प्रतापराव बिराळे, संजय प्र.वानखेडे, रामभाऊ गवई, सुखदेव गव्हाळे, जगदीश फुलपगारे ,शिवा फुलपगारे , उमेश बाविसाने, चंद्रभान झनके, संजय झणके, अमोल गजानन घाटे, प्रशांत इंगळे, जगदीश ठाकरे, सतीश सुपडा सावळे, प्रशांत गवई ,अरविंद सोनवणे, भोनाजी मोरे तर गावकऱ्यांतर्फे राहुल झणके, राजू वानखेडे, सागर भगत, दिलीप झनके, संदेश झनके, सिद्धार्थ झनके, प्रवीण वानखेडे, प्रमोद दादा झनके, अजय दादा झनके ,भास्कर झनके, सागर इंगळे, अमोल भगत, विशाल भगत, पांडुरंग भगत, ज्ञानेश्वर भगत ,संतोष वानखडे, योगेश वानखेडे ,मंगेश झाल्टे ,आकाश झनके, सुमित झनके, प्रज्वल वानखेडे, कैलास दादा झनके तर महिलां तर्फे महिला मंडळाच्या अध्यक्ष्या सीमा झनके, मंदाकिनी झंनके ,प्रमिला झणके, लता झनके ,राजकन्या झनके ,अनिता वानखेडे, लक्ष्मीबाई इंगळे, मिनाबाई झनके, कमलबाई इंगळे, रमाबाई झनके,रेखा कांबळे, अमृता इंगळे, माया वाकोडे ,गिरजाबाई थाटे, कौशल्याबाई गवई ,विमलबाई वानखेडे इत्यादी गावकरी उपस्थित होते.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने