संत ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड हरीश रावळ यांचे सह महीलांचे पाणीपुरवठा अभियंता कार्यालयातच आमरण उपोषण सुरू !


मलकापुर:- शहरातील संत ज्ञानेश्वर नगर ,सातव प्लॉट प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या आठ महिन्यापासून पंधरा ते वीस घरांना पाणी येत नाही, पाणीपुरवठा अभियंता बयेस यांना बऱ्याच वेळा विनंती करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, नळाला पाणी येत नाही त्यामुळे महिलांना उन्हातान्हात दुरून डोक्यावर पिण्याच्या पाण्यासाठी चांडक विद्यालयाजवळील पाणीपुरवठा विभागाकडे यावे लागते व पाणी एक ते दीड कि.मी.डोक्यावर आणावे लागत आहे, आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आज पाणीपुरवठा अभियंता बयैस यांच्या कार्यालयात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे व जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड . हरीश रावळ, अनिल बगाडे, पांडुरंग जगताप, गोपाल कावस्कर,कमलबाई भोपळे, शोभाबाई वावगे, लताबाई ईसाळकर,जिजाबाई जगताप, मंजुळाबाई देविकार, शारदाबाई जगताप, लक्ष्मीबाई वायडे,सरलाबाई वायडे, उषाबाई खराटे, जान्हवी वायडे, विशाल भोपळे, गणेश खराटे, चंदू वायडे,छोटूभाऊ ईसाळकर, विजय वायडे, हरीभाऊ कावस्कर,गोपाल वावगे, सागर जोशी, गणेश भोपळे, राहुल वायडे, भाग्यश्री वायडे, कैलास वायडे सह आदी महिला पुरुषांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने