मोताळा तहसील कार्यालयात दोघांकडून तलाठ्याला मारहाण !

मोताळा : फेरफारची नोटीस प्रसिद्ध का केली ? अशी विचारणा करत दोघांनी येथील तहसील कार्यालयात तलाठ्याला शिविगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कार्यालयातील लॅपटॉप व दस्तऐवज फेकून देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठी विश्वनाथ बळीराम उबरहंडे (रा. साने नगर, बुलडाणा) हे आज, 6 एप्रिल रोजी मोताळा येथील तहसील कार्यालयात कर्तव्यावर हजर होते. या दरम्यान आरोपी सुनील चंद्रभान घाटे (रा. पिंपळपाटी, सध्या रा. मोताळा) व विजय धांडे (रा. मोताळा) हे दोघे दुपारी 3.15 वाजता कार्यालयात आले. दोघांनी तलाठी विश्वनाथ उबरहंडे यांना फेरफारची नोटीस प्रसिद्ध का केली? 
अशी विचारणा करत वाद घातला. त्यानंतर त्यांनी उबरहंडे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. टेबलावरील लॅपटॉप व दस्तऐवज खाली फेकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच 'तू कशी नोकरी करतो' असे म्हणत धमकी दिली.
या प्रकरणी विश्वनाथ उबरहंडे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी सुनील घाटे व विजय धांडे या दोघांविरुद्ध कलम 132, 115 (2), 352, 351 (2), 3(5) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले पुढील तपास करत आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने