नांदुरा :- नांदुरा तालुक्यातील ग्राम शिरसोली येथील स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज दिनांक 27 .04. 2026 ला मलकापूर येथील सेवाभावी संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय प्रभाकरराव सावळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी माननीय संतोषराव शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तर उपविभागीय अधिकारी साहेबांनी हि प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतो असे आश्वासन दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदुरा तालुक्यातील ग्राम सिरसोडी येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित पडला आहे. यासंदर्भात गावचे सरपंच पती हर्षवर्धन सपकाळ आणि ग्रामस्थांनी माननीय पालकमंत्री मकरंद जी पाटील, जिल्हाधिकारी साहेब तसे नांदुरा तहसीलदार यांना संदर्भात वेळोवेळी निवेदन दिले. परंतु त्यानंतरही कोणतेही प्रकारची या प्रकरणात कार्यवाही झाली नाही. म्हणून आज दिनांक 27.0 4 .2026 ला सरपंच पती, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील शेकडो महिला आणि पुरुष यांनी उपविभागीय अधिकारी यांना मलकापुर येथील सेवाभावी संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय प्रभाकर सावळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. आणि सदर प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सदस्य भीमराव नितुने,मोहन शिरसाट, संजय वानखडे हे उपस्थित होते. तर ग्रामस्थांतर्फे गजानन वानखडे ,शिवदास वानखडे ,देवानंद वानखडे ,संतोष गवई सुभाष वानखडे ,मनोहर सरदार ,गजानन वानखडे ,दीपक वानखडे ,विकास वानखडे ,अनुज वानखडे, कडू किसन वानखडे ,आदित्य महादेव वानखडे ,अमित अरुण नारखेडे ,नितेश वानखेडे ,संतोष गवई, गजानन दांडगे, कौशल्य झणके ,दिनकर सरदार , वच्छलाबाई इंगळे ,आरती वानखेडे ,सोनाबाई तेलंग ,निर्मलाबाई वानखडे, इंदुबाई खराटे ,आशाबाई वानखडे, साधना वानखडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
्
टिप्पणी पोस्ट करा