मलकापूर येथे गुरे चोरणाराला रंगेहाथ पकडले !


मलकापूर ग्रामीण भागातील हनुमान नगर परिसरातून गेले 3 वर्षे झाले गाई व गोरे चोरीला जाण्याची व चोरून इंपॉरटेड गाड्या भरभरून नेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्यात आज सकाळी 4,5 वाजताच्या सुमारास हनुमान नगर मधीलच रहिवासी असलेला रघुनाथ बोरले उर्फ बाबू याला गस्त घालत असलेल्या युवकांनी गोरा गाडीत भरताना रंगे हात पकडले सदर गोरा हा सुपेश सुनिल वानखेडे वय-26 वर्ष व्यवसाय-फुल विक्री रा. हनुमान नगर मलकापुर याचा असून त्यांनी मलकापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे ती खालील प्रमाणे 

मी समक्ष पोलीस स्टेशन मलकापुर शहरला येवून तोंडी रिपोर्ट देतो की, मी वरील ठिकाणी राहतो व फुले विक्री करून माझे परीवाराचा उदरनिर्वाह करतो. तसेच माझे घराचे बाजुला गायीचा गोठा आहे. माझेकडे 06गाई, 04 गोरे व वास-या 05 असे एकुण 15 जनावरे आहेत. माझे दोन वर्षापूर्वी 02 गायी व एक महीण्यांपुर्वी एक गोरा चोरी गेलेला आहे त्याबाबत आम्ही पोस्टेला तक्रार सुदधा दिलेले आहे. तसेच आमच्या नगरातील खुप जनावरे चोरी गेलेले आहेत, त्यामुळे जनावरे चोरी होवू नये म्हणून आम्ही नगरातील मुले ग्रुपप्रमाणे जागरण करत असतो. माझा एक दिड वर्षाचा काळया लाल रंगाचा जर्शी जातीचा गोरा किंमती अंदाजे 20,000/-रु चा हा काल दि.27/04/2026 रोजी वाड्यातून सुटून गेला होता आम्ही त्याचा खुप शोध घेतला परंतु आमचा वरील वर्णनाचा गौरा दिसून आला नाही आज दि.28/04/2026 रोजी रात्री 04.30 वाचे सुमारास मी झापलेलो असतांना मला रोशन तळेकर व कुणाल नारखेडे यांचा फोन आला व त्यांनी मला सांगीतले की, आम्ही रात्री चारी होवू नये म्हणून जागरण करत
असताना हनुमान नगर येथुन एक दिड वर्षाचा काळ्या लाल रंगाचा जर्सी जातीचा गोरा घेवून जात असतांना आम्हाला आपल्या नगरातील रघुनाथ नारायण बोरले उर्फ बाबु बोरले दिसला आम्हाला सदर गोरा हा तुझा आहे असे वाटते असे सांगीतले म्हणून मी सदर ठिकाणी जावून पाहीले असता मला माझे मित्रानी सदर गोराचे वर्णन सांगीतले असता तो गोरा माझाच असल्याची मला खात्री झाल्या वरून मी आमच्या नगरातील रघुनाथ नारायण बोरले उर्फ बाबु बोरले यांना फोन लावून विचारले। विचारले की तुम्ही माझा गोरा चोरी केला असुन तो कुठे आहे ? त्याने सांगितले की, पारपेठ येथे बांधलेला आहे. वरुन मी पारपेठ येथे जावुन पाहिले असता एका लोखडी खांबाला माझा गोरा बांधलेला दिसला सदर गोरा माझेच असल्याचे माझी खात्री झाली. रघुनाथ नारायण बोरले उर्फ बाबु बोरले रा हनुमान नगर मलकापुर, याने माझा एक दिड वर्षाचा काळ्या लाल रंगाचा जर्सी जातीचा गोरा किंमती अंदाजे 20,000/-रु हा दि. 28/04/2026 रोजी रात्री 04.00 वा ते 05.00 वा दरम्यान चोरी करुन नेला आहे. तरी योग्य ती कार्यवाही व्हावी. असे (बजरंग दल शहर सहसंयोजक रितेश अशोकराव दहिभाते) यांनी मलकापूर ठाणेदार गिरी साहेब यांना सांगितले त्या वेळेस त्यांच्या सोबत उपस्थित, सार्थक तांबडे, निलेश गवात्रे, रोशन तळेकर, अक्षय वराडे, दत्तात्रय दंडे, सचिन जावरे, कुणाल नारखेडे, सुपेश वानखेडे
श्रीकांत कुलकर्णी, मोहित सुलताने श्रावण बोबटकर,विठ्ठल बोबटकर रोशन कांडेलकर,शुभम नारखेडे,पवन जावरे 
विशाल पवार ,पवन लाड इत्यादी पोलीस ठाणे मधे उपस्थित होते…

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने