शिवजयंती मिरवणुकीत नाचताना दोघांवर फायटर, शस्त्राने वार !सोन्याची चेन पळवली; मलकापूरमध्ये तणावपूर्ण शांतता


शिवजयंती मिरवणुकीत नाचताना बेसावध असलेल्या दोन शिवभक्तांना पाच जणांनी धारदार शस्त्र व फायटरने मारहाण करून दोन लाख रुपयांची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. ही घटना शहरात बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.

या प्रकरणी मयूर हुबे (वय ३३, रा. मलकापूर) गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी

ओम राजपूत, पवन राजपूत, धनराज राजपूत, अतुलसिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गंभीर जखमी विनोद काळे यांच्या वर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याच प्रकरणात पवन उर्फ शुभम गजानन सोळंके (वय २८, रा. गाडेगाव मोहल्ला, मलकापूर) याने पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये नमूद केले आहे की, मिरवणुकीत नाचत असताना आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कपाळावर तोंडावर फायटरने मारहाण करूण जखमी

केले. या तक्रारीवरून पोलिसांनी मयूर हुबे, राम घुले, विनोद काळे यांच्याविरुद्ध कलम ११८ (१), ११५ (२), ३५२,३ (५) बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ओम राजपूत, पवन राजपूत, यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे करत आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने