लासुर स्टेशन येथे तरुणीचा खून करून मृतदेह खड्ड्यात पुरल्याची धोकादायक घटना.


गंगापूर - लासुर स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथील मनपाच्या दवाखान्यात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेचा लासुर स्टेशन परिसरात खून करून मृत्यूदेह शेतातील घरात खड्डा करून पुरल्याची धोकादायक घटना शुक्रवार १४ उघडकीस आली सहा दिवसानंतर पोलिसांनी मृत्यूदेह बाहेर काढला असून यांची रात्री उशिरापर्यंत शिल्लेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू होती मोनिका मार्कस झाबरे वय 30 असे मयत परिचारिकेचे (नर्स) नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना येथील मोनिका मार्कस झांबरे ही तरुणी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सदात नगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून कार्यरत होती तिचा विवाह छत्रपती संभाजी गरीतील सुमित निर्मळ यांच्याशी झाला होता मात्र त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याने मोनिका ही जालना येथे आई-वडिलाकडे राहत होती तिथून ती दररोज जालना ते छत्रपती संभाजी नगर रेल्वेने अप डाऊन करून नोकरी करत होती. मात्र ६फेब्रुवारी रोजी नियमितपणे रेल्वेने जालना येथे घरी पोहोचली नाही म्हणून तिची आई सुनिता झांबरे यांच्या फिर्यादीवरून हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे तपास केला गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन इरफान

शेख यांचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पॉलिसी खाक्या दाखविता त्यांनी मोनिकाचा गळा आवळून खून केल्याची तसेच मृत्यूदेह त्याच्या लासुर स्टेशन येथील शेतात पुरल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी 14 फेब्रुवारी मोनिकाचे आई वडील नातेवाईकांना येऊन लासुर स्टेशन येथेल इरफानच्या शेतातील घरात उत्खलन केले त्यावेळी मोनिका हिचा मृत्यूदेह नग्न अवस्थेत कुजलेला आढळून आला पोलिसांनी घटनास्थळीस डॉक्टरांना पाचारण करून शवविच्छेदन केले. नातेवाईकांनी केला पति व त्याच्या कुटुंबावर आरोप मयत मोनिकाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी इरफान शेख यांनी मोनिकाच्या पती सुमित निर्मळ सासू सपना निर्मळ सासरे संजय निर्मळ यांच्या सांगण्यावरून मोनिका तिच्यावर अत्याचार करून खून केला मृत्यूदेह खड्डा करून पुरला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यामुळे खुनाचे नक्की कारण समजू शकले नाही. यावेळी नायब तहसीलदार ग्रामपंचायत कर्मचारी मयताचे नातेवाईक ऊपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप भागवत शिलेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक योगेश खटाने, आधीच शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर होते पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहे

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने