मलकापूर : प्रती संतनगरी शेगाव अशी ओळख असलेल्या मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे दि. २० फेब्रुवारी रोजी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. प्रकटदिनाच्या निमित्ताने हजारो आबालवृद्ध संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी 'जय गजानन'च्या जयघोषात अवघे गाव दुमदुमून गेले होते.
मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील श्री गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना केली आहे.
विविध धार्मिक कार्यक्रम
मंदिरात प्रामुख्याने ऋषी पंचमी, संत गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव साजरा होतो. दि. २० फेब्रुवारी रोजी संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पहाटे ५ वाजता अभिषेक, ६ वाजता होमहवन, ८ वाजता विजयग्रंथ २१ अध्याय पठणाची सांगता, तर दुपारी १२ वाजता ह.भ.प. अनिल महाराज बोदडे वसाडी यांचे काल्याचे
महाप्रसादाचे वितरण
काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरण सुरू करण्यात आले होते. मलकापूर व परिसरातील हजारो आबालवृद्ध भाविकांनी महाप्रसादाचा लाभघेतला. सायंकाळी संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. रात्री भारुडाचा कार्यक्रम उत्साहात झाला. कार्यक्रमाला पुरुष व महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा