चिखली : तालुक्यातील मालगणी येथे दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. ही दुर्दैवी घटना आज, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.
मोहम्मद अशपाक अब्दुल मालगणी येथील घटना रज्जाक हे आज सकाळी १० वाजतादरम्यान आपल्या नातवासोबत दुचाकीने मालगणीहून चिखलीकडे येत होत. या दरम्यान चिखलीहून बुलडाणा जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत मोहम्मद अशपाक यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा नातू मोहम्मद साद हा किरकोळ जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मोहम्मद साद याला तातडीने उपचारांसाठी हलवले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा