मिरवणुकीत हल्लाप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ


मलकापूर : येथील शिवजयंती मिरवणुकी सार्वजनिक उत्सव दरम्यान युवकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.
दोन आरोपींना अटक; दोघे फरार
मयुर हुबे व विनोद काळे बेसावध असताना पवन राजपूत, ओम राजपूत यांनी हल्ला चढवला.यावेळी तलवार, फायटरने मारहाण केली. यात मयुर व विनोद गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी मयुर हुबे याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असुन ओम रंजितसिंह राजपूत (वय २८, रा मलकापूर) पवन उर्फ गजानन सोळंके (वय २५) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे. या प्रकरणातील अतुल प्रतापसिंग राजपूत (वय ३९, धनराज मंगलसिंग राजपूत वय ३५), हे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने