डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
सेवा ट्रस्ट मलकापूर यांच्याद्वारे
दिला जाणारा दरवर्षीचा मानाचा
समाज भूषण पुरस्कार यावर्षी वडनेर
भोलजी येथील अतिशय होतकरू
आणि सध्या संग्रामपूर येथील महाराष्ट्र
बँकेत व्यवस्थापक या पदावर कार्यरत
असलेले विजय शालिग्राम इंगळे यांना
देण्याची घोषणा करण्यात आली.
दरवर्षी पुरस्कार समाजातील जे
प्रेरणा स्थायी आणि विविध चांगल्या
पदावरील लोकांना समाजासमोर
समाजातील युवकांसमोर एक आदर्श
ठेवण्यासाठी हा पुरस्कार सुशिक्षित
आणि समाजासाठी भूषण असलेल्या
लोकांना देण्याची परंपरा या वर्षी
सुद्धा कायम ठेवून संस्थेचे अध्यक्ष
अजय सावळे यांनी सर्वानुमते
यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार हा
वडनेर भोलजी येथील अतिशय गरीब
परिस्थितीतून शिकून बँक व्यवस्थापक या पदापर्यंत गेलेले विजय शालिग्राम इंगळे यांना देण्याची घोषणा करण्यात आली. सदर समाजभूषण पुरस्कार घोषित होताच समाजातील विविध स्तरातील लोकांनी विजय इंगळे यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी संस्था चांगल्या लोकांना आदर्श ठेवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी सुशिक्षित लोकांना हा पुरस्कार देत असते त्याबद्दल संस्थेचे सुद्धा समाजाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विजय शालिग्राम इंगळे नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील अतिशय छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच घरी अठरा विश्व दारिद्र्य शिक्षणासाठी कोणते प्रकारे पोषक असे वातावरण नसताना विजय भाऊ हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांच्या घरासमोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असल्यामुळे त्यांची आई त्यांना नेहमी बाबासाहेबांसारखा मोठा हो बाळा वाक्य असे नेहमी म्हणत असे. त्यात बोलण्याचा ध्यास घेऊन आणि आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अठरा विश्व दारिद्र्य असून सुद्धा विजय भाऊ अतिशय जिद्दीन आणि कष्टाने अभ्यास करत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे वडनेर भोलजी येथील मोहता शाळेत झाले. तर बारावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी अतिशय हाल अपेष्टा सहन केल्या. अकोला ते प्रसिद्ध अशा नागरा हॉटेलमध्ये त्यांनी रात्री वेटरचे काम केले आणि शिक्षणासाठी पैसा जो
हवा होता तो वेटरच्या माध्यमातून
काम करून रात्री काम आणि दिवसा
अभ्यास अशा भूमिकेतून त्यांनी
अतिशय हालअपेष्टा सहन करून
आपले शिक्षण पूर्ण केले. आपले
पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी अर्थशास्त्र
या विषयात त पूर्ण करून नंतर
बँकिंगची परीक्षा जी अतिशय कठीण
समजली जाणारी परीक्षा ते उत्तीर्ण
होऊन त्यांचे व्यवस्थापक या पदावर
बोदवड येथील शेलवाड येथे नियुक्ती
झाली. आणि आपल्या आई वडिलांचे
स्वप्न त्यांनी साकार केले. यानंतर
विविध ठिकाणी ते व्यवस्थापक म्हणून
काम पाहत आहे परंतु त्याचबरोबर आपले सामाजिक दायित्व म्हणून ते सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्याचे तसेच मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत. आपले सामाजिक दायित्व समजून त्यांनी वडनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे स्वखर्चातून सौंदर्याकरण केले. आणि सामाजिक जबाबदारी समजून गरीब विद्यार्थ्यांना आजही ते वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत. आपल्या जीवनातील खडतर प्रवासाचे वर्णन त्यांनी आपल्या अतिशय मार्मिक आणि सत्य लेखणीतून "मुश्किल दौर भी जरुरी है"हे पुस्तक आपल्या जीवनातील सत्य परिस्थितीवर लिहिले आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा