मलकापुरः- दसरखेड एम.आय.डी.सी
ठाणेदार हेमराज कोळी यांच्या अखत्यारीतील ग्रामीण भागांमध्ये अवैध व्यवसाय, दारु, मटका, जुगार रेतीमाफीया असे अनेक धंदे राजरोसपणे सुरु असून त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाणीच्या लाभापोटी त्यांच्यावर कारवाई न करता सामान्य शेतकरी लोकांना नाहक त्रास देऊन चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा अफलातून कारभाराविरुद्ध जि.पो अधीक्षकांकडे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत विश्वनाथ पुरकर यांनी लेखी तक्रार आज दि.20 मार्च रोजी केली आहे, तक्रारीत नमूद केले आहे की काल दि. 19 मार्च बुधवार रोजी माझा पुतण्या नामे आदित्य काशिनाथ पुरकर वय 23 रा. नरवेल हा त्याच्या गट नंबर 2 हिंगणा नागापूर शिवारातील शेतात दिवसभर कामं करून सायंकाळी गुराढोरांना, कोंबड्यांना चारापाणी करून जेवणासाठी रात्री आठ वाजता शेतातून घराकडे येत असताना ठाणेदार हेमराज कोळी व सहकार्याने त्याची दुचाकी गाडी रस्त्यात थांबविली व दमदाटी करत गाडीची कागदपत्रे, लायसन दाखविण्याचे सांगितले, यावेळी आदित्य ने साहेब मी आता शेतातून काम करून आलो आहे आणि मला परत शेताची व कुकुट पालनाची रखवाली साठी जायचे नाही तर माझे हिंसक प्राण्यांपासून खूप नुकसान होईल आता फक्त माझ्या पाकिटमध्ये लायसन आहे गाडीची कागदपत्रे घरी आहे मी सकाळी देतो अशी विनंती करून जवळील लायसन दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र काही एकूण न घेता ठाणेदार कोळी यांनी त्याच्या ताब्यातून दुचाकी
घेऊन शेतकऱ्याला पायी घरी जाण्यास
भाग पाडले दुचाकी घेऊन होमगार्ड
याने सरळ पोलीस स्टेशन गाठले
व कागदपत्रे घेऊन या नंतर गाडी
घेऊन जा असा असे फर्मान सोडले,
ठाणेदाराच्या या अजब कारवाईमुळे
ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे, गावातील
ग्रामस्थ पो. स्टेत फिर्याद देण्यास गेले
असता कोणाचीच फिर्याद घेतली
जात नाही, असाच प्रकार प्राथमिक
आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्याला
मद्यधुंद अवस्थेतील लोकांनी दि. 16
मार्च 25 रोजी सकाळी उपकेंद्रात
जाऊन मारहाण केली, मारहाण
करतांनाचे व्हिडिओ चित्रीकरण
सुद्धा आरोपींतानी केले आहे सदर
अन्यायग्रस्त महिला कर्मचारी पोलीस
स्टेशनला त्यांच्याविरुद्ध फिर्याद देण्याकरिता गेली असता त्याच महिलेकडून माफीनामा लिहून घेवून आरोपीच्या पाया पडायला लावून आर्थिक फायद्यासाठी प्रकरण दडपून टाकले, ठाणेदार हे अन्यायग्रस्तांच्या पाठीशी आहे की गाव गुंडांच्या पाठीशी आहे हे समजेनाशे झाले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे विश्वनाथ पुरकर यांनी जि.पो अधिक्षकांकडे केली आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा