मलकापुरः- नायब तहसीलदाराच्या
आदेशाला तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असल्याने संबंधित 32 प्लॉट धारकांना पंधरा दिवसात सातबारा न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर 32 प्लॉट धारकांसह शिवसेना (उ.बा ठा) शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दि.24 मार्च सोमवार रोजी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला होता शिवसेनेच्या दि.7 एप्रिल रोजीच्या आमरण उपोषणाच्या ईशाऱ्याच्या धास्तीने आज दि.26 मार्च रोजी तिसऱ्याच दिवशी फेरफार रुजू करून मंडळ अधिकारी सिंधुताई झिने, तलाठी शितल गावंडे यांनी 32 प्लॉट धारकांना सातबारा उतारा दिल्याने सर्व प्लॉटधारकांनी शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांचे आभार मानले ! मौजे दाताळा येथील गट नंबर 961 मधील अशपाक खा रहीम उल्लाखा, जगन्नाथ सुपडा ढवळे, लता दिनकर बढे, एकनाथ निवृत्ती तायडे, सुरेश सखाराम चोपडे, माधव जयराम तायडे, सुपडा मोतीराम सोनोने, बळीराम शामराव खर्चे, रवींद्र रामभाऊ तायडे, दामोदर रामा वराडे, माधव जयराम तायडे, रमेश गोविंदा बढे, दिनकर अंबादास जोशी, गजानन अंबादास जोशी, ओंकार नामदेव चौधरी, हरिभाऊ लक्ष्मण देशमुख, अर्चना संतोषसिंग राजपूत, शंकर सिताराम नारखेडे, जनार्दन एकनाथ देशमुख, श्रीराम नथ्थु नाफडे, शंकर रघुनाथ चौधरी, किशोर निवृत्ती चौधरी, योगेंद्र विजय महाजन व इंदुबाई विजय महाजन, संगीता भरत चौधरी, विलास पुरुषोत्तम खर्चे, वासुदेव वामन नाफडे, सिंधू सदाशिव नाफडे, नैनेश परमेश्वरसिंह राजपूत, भास्कर रामकृष्ण तायडे, संतोष रमेश पाटील, सुपडा मोतीराम सोनोने, बन्सीलाल सुरजमल धूत यांच्या नावाने सातबारा दक्ता क्रं 1 मधील खातेदाराचे नावासमोर रकाना क्रं.4 नुसार क्षेत्रफळाचे नोंद घेण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार आज सर्व 32 प्लॉट धारकांना मौजे दाताळा येथील तलाठी कार्यालयात बोलावून तलाठी शितल गावंडे यांनी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांच्या उपस्थितीत 32 प्लॉट धारकांना सातबारा उतारा मिळाल्याने सर्वांनी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांचे आभार मानले !
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा