नांदुराः तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळील एका शेतातील विहिरीत २४ मार्च रोजी सकाळी महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिस आणि ओम साई फाउंडेशन जीवनरक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे एका तासाच्या प्रयत्नानंतर टीमने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृत महिलेची ओळख चंद्रभागा पांडुरंग धोरण (वय ४५) अशी पटली असून, तिचा मृतदेह नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे. या घटनेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी नांदुरा पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती. पोलिस पुढील तपास करत आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा