नांदुरा :- तालुक्यातील निमगाव फाटा येथील पाइप फॅक्टरीजजवळ २७ मार्च २०२५ रोजी सकाळी सात वाजता झालेल्या भीषण अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाला. मृत चालकाचे नाव पुरुषोत्तम निवृत्ती घाईट (वय ४०, रा. नांदुरा) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, घाईट हे आपल्या चारचाकी वाहनाने नांदुरा येथे जात असताना वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होते. वेगावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघात एवढा भीषण होता की, वाहन पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले आणि पुरुषोत्तम घाईट यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मृताचा चुलत भाऊ विष्णू येलू घाईट (वय ४३, रा. बालाजी नगर, नांदुरा) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहन आणि गंभीर अवस्थेतील पुरुषोत्तम यांना पाहून तातडीने मदतीसाठी प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा