मोताळा – तालुक्यातील एका २९ वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन लहान मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, वर्षा शिवाजीराव देशमुख (वय २९) ही महिला आपल्या दोन मुलांसह अचानकपणे घरातून बाहेर पडली व परत न आल्याने कुटुंबीयांनी तिला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठेही थांगपत्ता न लागल्याने अखेर तिचे पती शिवाजीराव देशमुख यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता महिलेची नोंद करून तपास सुरू केला आहे. अद्याप तिच्या बेपत्ता होण्यामागचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा