मलकापूर (प्रतिनिधी) पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीणच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी) अशा प्रकारचे स्टेटस, स्टोरी, पोस्ट, रील्स किंवा व्हिडिओ अपलोड करू नये जे धार्मिक भावना दुखावणारे असतील. असे कृत्य केल्याने गावांमध्ये दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखणाऱ्या पोस्ट केल्यास गय केली जाणार नाही. पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी सांगितले की,काही वेळा नागरिक अज्ञानात किंवा भावनेच्या भरात चुकीची माहिती शेअर करतात.
त्यामुळे समाजात गैरसमज, अफवा आणि असुरक्षितता पसरते. विशेषतः होळी, रंगपंचमी यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कोणतीही वादग्रस्त पोस्ट शेअर करणे टाळावे.
दिनांक २३ मार्च २०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री. काळे यांच्या नेतृत्वाखाली 'फुलोरा' या मोहिमेंतर्गत १३४ गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. गावागावात जाऊन तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले की, कोणतीही धार्मिक भावना दुखावणारी स्टोरी, पोस्ट, रील्स अपलोड करू नये. त्याचप्रमाणे गावांमध्ये जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, • असेही आवाहन करण्यात आले.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा