एसटी महामंडळाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा चव्हाट्यावर !



     


मलकापूर : दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी मलकापूर ते संभाजीनगर जाणारी गाडी क्रमांक MH 13 Cu 7503 ही गाडी मलकापूर येथून सकाळी सहा वाजता असल्याने या गाडीने बुलढाणा येथे नोकरी करणाऱ्या नोकरवर्गाची संख्या जास्त असते तसेच बरेच वेळा पेशंट सुद्धा या गाडीने संभाजीनगर येथे उपचारार्थ जात असतात परंतु एसटी महामंडळाचे नियोजन शून्य कारभारामुळे आज ही गाडी तब्बल अर्धा तास उशिरा म्हणजे साडेसहा वाजता मलकापूर येथून निघाली याचे कारण विचारले असता गाडीला कंडक्टर (वाहक ) नाही अशी माहिती देण्यात आली संबंधित गाडीच्या वाहकाने वेळेवर आपली ड्युटी बदलून घेतली असल्याचे सांगण्यात आले परंतु या वाहकाला वेळेवर ड्युटी बदलून कोण देतो? तो अधिकारी कोण? असा सवाल जनतेला पडला आहे या बेजबाबदार एका अधिकारी व वाहकाच्या दिरंगाईमुळे जवळपास दीडशे ते दोनशे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते यावरून असे दिसून येते की एसटी महामंडळाचा कारभार हा नियोजन शून्य व हुकूमशाही पद्धतीने चालविण्यात येत आहे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना फक्त आंदोलने संप व पगार वाढ ह्याच गोष्टी वेळेवर करता येतात का? असा प्रश्न जनतेला पडला आहे या प्रकाराला आगार व्यवस्थापक सुद्धा कुठेतरी जबाबदार असल्याचे दिसून येते तसेच आपल्या कर्मचाऱ्यांवर आगार व्यवस्थापकांचे किती नियंत्रण आहे हे सुद्धा या प्रकारावरून दिसून येते वारंवार शिवसेना (उ बा ठा) , दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन व इतर राजकीय पक्षांच्या माध्यमातून एसटीला गावाची पाटी नसल्याच्या तक्रारी चे निवेदन आगार व्यवस्थापक मलकापूर यांना देण्यात आले आहे परंतु निवेदन दिल्यावर फक्त दोन ते चार दिवस एसटीला पाटी लावण्यात येते, आज या बाबत विचारणा केली असता एसटीच्या 150 ते 200 पाट्या बुलढाणा येथे बऱ्याच दिवसापासून रंगविण्यास देण्यात आलेले आहे असे बे जबाबदारपणे उत्तर दिल्या जात आहे तरी अशा बेजबाबदारपणे व हुकूमशाही पद्धतीने मनमानी पद्धतीने एसटी महामंडळाचा कारभार चालवणाऱ्या वाहक व ड्युटी बदलून देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता का दाखवण्यात येवू नये ? किंवा एसटी नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई का करण्यात येऊ नये ? असा सवाल जनतेत उपस्थित होत आहे

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने