नांदुरा ( पीपल्स टाईम्स वृत्तसेवा) :-सकाळच्या शांततेत गोंधळ उडवणारा एक आवाज... काही क्षणांत सगळं बदलून गेलं. आज १५ एप्रिलच्या सकाळी साडेआठच्या सुमारास, आमसरी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला. अमरावतीहून बऱ्हाणपूरकडे जाणारी मध्य प्रदेश परिवहन विभागाची एसटी बस आणि विटांनी भरलेला ट्रक समोरासमोर धडकल्याने, क्षणात घटनास्थळी भीषण दृश्य निर्माण झालं.
स्थानिकांच्या माहितीनुसार, ट्रक चुकीच्या दिशेने येत होता. त्यामुळे दोन्ही वाहनांची आमसरी फाट्याजवळ जोरदार धडक झाली. या धडकेत ट्रकमधील तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या श्वासांचा अंतिम क्षणही त्यांच्या ओळखीशिवाय निघून गेला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. बसमधील २० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बचावकार्याला पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तत्परतेने हातभार लावला. हा अपघात केवळ दोन वाहनांचा नव्हता – तो आयुष्यांचा, स्वप्नांचा आणि श्वासांचा होता. एका चुकीच्या मार्गाने घेतलेली वळणं, किती जीवघेणी ठरू शकतात, याची जिवंत साक्ष आज मिळाली.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा