यावल.ता ( पीपल्स टाईम्स वृत्तसेवा) तालुक्यातील अंजाळे गावाजवळील तापी नदीपात्रात रविवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. पाच वर्षाच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व मावशीसह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या ल् घडली. अंजाळे येथील बादल लहू भील या जेसीबी ऑपरेटरच्या घरी काल खंडोबाच्या जागरणाचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मावस बहिणी व इतर नातेवाईक घरी आले होते. कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीकरिता ते तापी नदीपात्रावर गेले असताना ही दुर्घटना घडली. नदीपात्रात पाय घसरून वैशाली सतीश भील (वय २८, रा. अंतुर्ली, ता. अमळनेर) यांचा पाच वर्षांचा मुलगा नकुल पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी आई वैशाली आणि मावशी सपना गोपाळ सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव) यांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पोहता न येणाऱ्या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी सोबत असलेल्या अनु सतीश भील या मुलीने धावत घरी येत ही माहिती दिली. नंतर ग्रामस्थांनी धाव घेतली आणि स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेने अंजाळे गावावर आणि मृतांचे मूळ गाव असलेल्या अंतुर्ली व पळाशी 4 येथे शोककळा पसरली असून, • यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा