मलकापूर दिनांक :- १६/०४/२०२५
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ, ग्रामविकास विकास विभाग, मुंबई यांची अधिसूचना दिनांक ०५/०३/२०२५ व मा. जिल्हाधिकारी बुलडाणा यांची सुधारीत अधिसूचना दिनांक २१/०३/२०२५ नुसार मलकापूर तालुक्यातील एकूण ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचाची पदे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३० (४) (५) अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार सन २०२५ ते २०३० दरम्यान मलकापूर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणाऱ्या ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक १६/०४/२०२५ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता तहसिलदार मलकापूर श्री. आर. एम. तायडे, यांचे अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, मलकापूर येथे सोडत काढण्यात आली.
सर्वप्रथम अनुसूचीत जातीचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार १९९५ ते २०२० या दरम्यान अनुसूचीत जातीकरीता आरक्षित ग्रामपंचायती वगळून खालीलप्रमाणे ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. १) उमाळी, २) जांबुळधाबा, ३) चिखली, ४) देवधाबा, ५) घिर्णी, ६) वाघोळा, ७) मोरखेड बु., ८) कुंड बु..
त्यानंतर मलकापूर तालुक्यातील अनुसूचीत जमातीचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार १९९५ ते २०२० या दरम्यान अनुसूचीत जमातीकरीता आरक्षित ग्रामपंचायती वगळून खालीलप्रमाणे ४ ग्रामपंचातयती आरक्षित करण्यात आल्या. १) तांदुळवाडी, २) वाकोडी, ३) धरणगाव, ४) वडोदा.
त्यानंतर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील आरक्षण काढण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम १९९५ ते २०२० मध्ये दोन वेळा ना.मा. प्र. करीता आरक्षित ग्रामपंचायती वगळून एक वेळा आरक्षित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधून खालीलप्रमाणे सोडत पध्दतीने चिठ्ठया टाकून १२ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. १) लासुरा, २) कुंड खुर्द, ३) तिघ्रा, ४) हरसोडा, ५) वाघुड, ६) पिंपळखुटा महादेव, ७) अनुराबाद, ८) भालेगाव, ९) पान्हेरा, १०) नरवेल, ११) वरखेड, १२) काळेगाव.
उर्वरित खालीलप्रमाणे २५ ग्रामपंचायती सर्वसाधारण सरपंच पदाकरीता आहेत. १), हिंगणा काझी, २) पिंपळखुटा बु., ३) निमखेड, ४) म्हैसवाडी, ५) बहापुरा, ६) गोराड, ७) तालसवाडा, ८) खामखेड, ९) माकनेर, १०) आळंद, ११) विवरा, १२) लोणवडी, १३) वडजी, १४) भानगुरा, १५) हरणखेड, १६) दुधलगाव खुर्द, १७) झोडगा. १८) शिराढोण, १९) निवारी, २०) दाताळा, २१) भाडगणी, २२) दुधलगाव बु., २३) बेलाड, २४) मलकापूर ग्रामीण व २५) दसरखेड. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.
सदर सभेस मलकापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडतीचे निरीक्षक म्हणून श्री. संतोष शिंदे, उपविभागीय अधिकारी, मलकापूर हे उपस्थित होते. सदर आरक्षण सोडत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवासी नायब तहसिलदार डॉ. चारुशिला चौधरी, सहायक महसूल अधिकारी सी.पी. पाटील, पी.डी. भारंबे, महसूल सहायक जी.यु. खुळे, महसूल सेवक सचिन चोपडे, सुनिल न्हावकर यांनी विशेष प्रयत्न केले.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा