बेलाड येथील ४३ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू; मलकापूर तालुक्यातील घटना !


मलकापूर :-(पीपल्स टाईम्स वृत्तसेवा ) तालुक्यातील बेलाड गावात ४३ वर्षीय शेतकऱ्याचा सूर्याच्या तीव्र झळांमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या तापमानाने ४१ अंशाचा टप्पा पार केला असून, दुपारच्या वेळेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मृत शेतकऱ्याचे नाव गोविंद एकनाथ इंगळे (वय ४३, रा. बेलाड) असे असून, त्यांना उन्हाच्या तीव्र झळांमुळे शारीरिक त्रास होऊन मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या चुलतभावाने त्यांना मृतावस्थेत मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील कक्षसेविका सरिका झाझोट यांनी ही माहिती डॉ. वाकोडे .यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी मर्ग नोंदवून पुढील
तपास सुरू केला असून, एपीआय तायडे हे तपास करत आहेत. सध्या उन्हाचा
पारा ४१ अंशांवर पोहोचला असून, दुपारच्या सत्रात २ ते ४ वाजेदरम्यान शहरी व ग्रामीण भागातील रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने