नांदुरा : समाज माध्यमाचा वापर करतांना कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या असे आवाहन नांदुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी केले आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमुद आहे की, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात आपल्या निष्पाप नागरिकांचे प्राण गेलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. अशा अतिरेकी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. वरील दुःखद घटनेचा काही समाज विघातक कृत्य करणारे फायदा घेऊन आपल्या गावाची, शहराची, राज्याची तसेच भारत देशाची अखंडता, बंधुता यात दरी निर्माण करून सोशल मीडियावर दोन धर्मामध्ये, जाती जातीत तेढ निर्माण करू शकतात. त्यामुळे समाज माध्यमाचा वापर करताना कोणत्याही धर्माच्या भावना दुखावून जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच व्हाट्सअप, द्विटर, द्विटर आणि इतर समाज माध्यमातून आपणास आलेल्या पोस्ट, विडिओ, फोटो याची शहानिशा करूनचं दुसऱ्या ग्रुपवर पाठवावी, त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास कोणीही कायदा हातात न घेता तात्काळ पोलीस स्टेशन नांदुरा येथे संपर्क साधावा. कोणी समाज माध्यमाचा गैरवापर केल्यास त्याच्याविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन विलास पाटील यांनी केले आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा