मेहकर : येथील सुरेश जानकीराम आडे ग्रामपंचायत सदस्य मोहना बु.
यांनी सदस्य पदावर कार्यरत असताना मौजे मोहना बु. ता.मेहकर येथील शासकीय गट नं. 150 मध्ये मालमत्ता क्रमांक 329 वर जि.ओ. टॉवर उभारुन अतिक्रमण केल्याचे दिसुन येते.
तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ज-3) अंतर्गत अनर्हता बाबत नमुद तरतुदींचा भंग केल्यामुळे अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी आदेश क्रमांक कावि/ग्रापनि/कक्ष-15/634/2021 दिनांक 11/11/2020 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारातुन दिनांक 28/04/2028 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहे.
आदेश -
1. अर्जदार यांचा अर्ज मंजुर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार श्री. सुरेश जानकीराम आडे, सदस्य ग्रामपंचायत मोहना बु. ता. मेहकर यांना ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (ज-3) च्या तरतुदींनुसार अनर्हता प्राप्त होत असल्यामुळे त्यांना सदर आदेशाचे दिनांक 28/04/2025 पासुन पुढील कालावधीकरीता अपात्र घोषित करण्यात येते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा