मलकापूर येथील प्रणव कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या घरोघरी कम्प्युटर योजनेअंतर्गत "श्रापित बॉटल" या शॉर्ट फिल्मचा आज होणार पार्ट 1 रिलीज !


मलकापूर :- मलकापूर येथे माता महाकाली रोडवर प्रणव कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ही मुलांना संगणक प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूट असून या इन्स्टिट्यूट चे संचालक कैलासजी गणगे सर हे विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट व्हावी याकरिता नेहमीच अग्रेसर असतात मलकापूर तालुक्यात प्रथमच घरोघरी कम्प्युटर योजना आणून या योजनेतून बऱ्याचशा होतकरू गरजू व गरीब विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह मोफत संगणक संच सुद्धा उपलब्ध करून देण्याचे प्रशंसनीय कार्य कैलास जी गणगे सर करीत आहे या योजनेमार्फतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रणव इन्स्टिट्यूट निर्मित "श्रापित बॉटल " या शॉर्ट फिल्मचा आज दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता पार्ट 1 रिलीज होणार आहे या शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिका नील पंकज मोरे व कर्तव्य वेरूळकर यांनी साकारली आहे या पार्ट1 च्या रिलीज करिता विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या संख्येने प्रणव कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करावे असे आवाहन प्रणव कॉम्पुटर इन्स्टिट्यूट चे संचालक कैलासजी गणगे यांनी केले आहे

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने