मलकापुरच्या बुरड विरूध्द बुलढाणा पो.स्टे.ला पोस्कोचा गुन्हा दाखल !


मलकापूर : मलकापूरच्या एका ६३ वर्षीय व्यक्तीने घरात घुसून आई-वडील कोठे आहे? असे विचारत १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी बुलढाणा पोलिस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीविरूध्द पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केल्याची घटना १७ जून रोजी घडली.

याबाबतची माहिती अशी की, बुलढाणा तालुक्यातील बोरखेड येथे मलकापूर येथील इस्टेट ब्रोकर सुनील बुरड (वय ६३) याने गैरव्यवहारातून शेती घेतलेली आहे. या व्यवहारांना सावकारकीची काळी किनार असल्याचे सूत्रांकडून कळते. काल बुरड हा बोरखेडमध्ये गेला होता. ज्याच्याशी व्यवहार आहे, त्याच्या घरी जेव्हा बुरड पोहोचला तेव्हा घरात एक १२ वर्षीय मुलीशिवाय कुणी नव्हते. बुरडने मुलीला तिचे आईवडील कुठे आहे, अशी विचारणा केली. आणि दुसऱ्याच

क्षणी तिला जवळ ओढून तिचा विनयभंग केला. पिडीत मुलीने घाबरून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपी सुनील बुरड लगेच बाहेर आला आणि मोटरसायकल घेऊन तिथून पळून गेला.

पीडित मुलीने सदर घटना आपली आजी आणि वडील यांना सांगितलेः त्यानंतर सदर परिवाराने बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात सदर घटनेबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात अप.क्र. २२१/२०२५, भारतीय न्यायसंहितेची कलम ७४, ३३३, सह कलम ८, १२ एक्स नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठाणेदार कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये पीएसआय गोकुळसिंग राठोड प्रकरणाचा तपास करीत आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने