मलकापुरः- नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी येथे देवी दर्शन घेऊन त्रिवेणी संगम नदीपात्रात आंघोळ करीत असताना मायलेकींचा पाय घसरल्याने त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोन महिलाही पाण्यात डुबत असल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी बचाव कार्यास सुरुवात केली यात दोन महिलांना वाचविण्यात यश आले असून दोन्ही मायलेकींचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना दि १६ जुन २०२५ रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान निंबोळा येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की खामगाव येथील सुटाळपुरा, गढीजवळ राहणाऱ्या पूनम मयूर जामोदे वय 32, कु. आर्वी मयूर जामोदे वय 5, संध्या सागर जामोदे वय 34, राधा गजानन जामोदे वय 54 ह्या नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी येथे दर्शनासाठी आल्या होत्या दर्शन आटोपून त्या मंदिरा जवळील नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेले असता दोघा मायलेकींचा पाय घसरल्याने त्या नदीपात्रात पडल्या त्यांना वाचविण्यासाठी संध्या जामोदे,राधा जामोदे ह्या गेल्या असता त्याही डुबू लागल्याने त्यांनी आरडाओरड केली त्याच वेळी नदीजवळ पुजा करीत असलेल्या कृष्णा काळे चांदुर
बिस्वा, संतोष पठाडे रा. केदार यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता सध्या जामोदे, राधा जामोदे यांना वाचण्यात यश आले, सर्वांना उपचारार्थ डॉ. चेतन जाधव यांचे खाजगी दवाखान्यात दाखल केले. घटनेची माहिती
मिळताबरोबर माजी नगराध्यक्ष अॅड
हरीश रावळ शिवसेना शहरप्रमुख
गजानन ठोसर, नगरसेवक अनिल
गांधी, नगरसेवक अनिल बगाडे,
पत्रकार अशोक रवणकार सह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. उपचारादरम्यान नाकातोंडात पाणी गेल्याने पुनम मयूर जामोदे वय 32, आर्वी मयूर दामोदर वय 5 ह्या दोघींचा मयलेकींचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. नी सांगितले. तर संध्या जामोदे व राधा जामोदे यांच्यावर डॉ. चेतन जाधव यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, शहर पो.स्टे मलकापुर येथे मर्ग दाखल करुन पो.उप.नि सुरेश रोकडे यांनी पंचनामा करून सायंकाळी पाच वाजता दोन्ही मायलेकींचे मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा