बुलडाणा : शहरातील कारंजा चौकातील दुर्गा माता मंदिराची दानपेटी चोरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवसात अटक केली. दोन्ही आरोपी शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमधील असून, दानपेटीमधून त्यांनी १९ हजार रुपये चोरले असल्याचे समोर आले आहे. यातील १४ हजार रुपये आरोपींनी हौसमजेत खर्च केल्याने पोलिसांना केवळ ५ हजार रुपयेच हस्तगत करता आले.
२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर कारंजा चौकातील दानपेटी चोरण्यात आली होती. याबाबत मंदिरातील गाभाऱ्यात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये एक आरोपी आढळून आला होता. चोरीची तन्हा आणि वजनदार दानपेटी या दोन गोष्टींमुळे या प्रकरणांमध्ये एकापेक्षा अधिक आरोपी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. मंदिर परिसरातील इतरही सीसीटीव्ही फुटेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर ही दानपेटी चोरण्यात दोन जण सहभागी असल्याचे स्पष्ट झाले.
अक्षय दिगंबर गवारगुरू (वय २८) आणि मनोहर कैलास पवार (वय ३०) या दोन आरोपींनी दानपेटीत चोरून ती प्रबोधन विद्यालयाच्या कॉर्नरजवळ आणून ठेवली होती. दानपेटीतील पत्रा वाकवून आतील रक्कम चोरण्यात आली होती. दानपेटी दोन जणांकडूनही उचलणे शक्य नसल्यामुळे त्यांनी यासाठी इंडियन गॅस एजन्सीच्या गल्लीतून एक पायडल रिक्षा आणली होती. पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तंत्रज्ञानाची मदत घेत दोन्ही आरोपींना जेरबंद केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले, पोलीस कॉन्स्टेबल कोमल इंगळे, राजू आडवे आणि ऋषी खंडेराव यांच्या पथकाने एका दिवसातच आरोपींना अटक केली.
या आरोपींनी १९ हजार रुपयांपैकी १४ हजार रुपये हौसमजेत खर्च केल्याने केवळ ४ हजार ६५५ मिळाले. या वजनदार दानपेटीला खालून चाके असल्यामुळे तिला सहजरित्या दुसरीकडे हलविण्यात आरोपी यशस्वी झाले होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
Advertise 👇
टिप्पणी पोस्ट करा