मलकापूरः कुलमखेड येथून 21 वर्षीय महिला बेपत्ता


मलकापूर : कुलमखेड (ता. मलकापूर) येथे राहणारी 21 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली ही घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली असून यामुळे कुटुंबीयांना मोठी चिंता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ती घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, परंतु तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

शेवटी कुटुंबीयांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासासह पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने