मोताळा : माकोडी येथील 22 वर्षीय युवती बेपत्ता


मोताळा तालुक्यातील माकोडी येथील 22 वर्षीय तरुणी 20 नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणाची नोंद 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता धामणगाव बडे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवती कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने नातेवाईक व मैत्रिणींनी विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र कुठेही ती आढळून आली नाही. अखेर नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे.
धामणगाव बडे पोलीस पुढील तपास करीत असून, नागरिकांनी युवतीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने