अॅड हरीश रावळ यांच्या आक्रमक इशाऱ्याने प्रशासन हादरलं; फक्त २ दिवसांत डीपी बसवण्याचं अभियंता खान यांचं तातडीचं आश्वासन !"

मलकापुरः- तालुक्यातील वडोदा येथील उत्तम पाटील यांच्या शेतातील (काळी वरील डीपी) गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्याने या डीपीवरील 25 ते 30 शेतकरी विहिरीत पाणी असताना रब्बी हंगामाची पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी अभियंता, लाईनमन, वायरमन, यांना वेळोवेळी भेटून लेखी व तोंडी तक्रारी केल्या मात्र म.रा.वि विं कंपनीने कुठलीच दखल घेतली नसल्याने आज दि. 7 नोव्हेंबर 25 रोजी अॅड हरीश रावळ यांच्या नेतृत्वात वडोदा येथील शेतकऱ्यांनी शिवाजीनगर मधील म.रा.वि.वि. कार्यालयाचे अभियंता खान यांची भेट घेतली यावेळी आज डीपी न वदलविल्यास कार्यालयातच शेतकऱ्यासह आमरण करण्याचा इशारा दिला, या इशाऱ्याच्या धास्तीने खान यांनी सोमवार पर्यंत दोनच दिवसात डि.पी बदलवून देण्याचे आश्वासन अॅड हरीश रावळ सह शेतकऱ्यांना दिले, यावेळी शेतकरी सुनील बोराडे, संजय भिसे, गुणवंत मोरे, शेख आरिफ शेख बादर, संजय मालवाडे, संतोष भाकरे, गणेश देशमुख, भास्कर डोबाळे, एकनाथ मोहोळ, सोपान गायकवाड, उत्तमराव गायकवाड, शेख इरफान शेख उस्मान, गुणवंत दौलत मोरे सह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.


बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने