महाराष्ट्र एनजीओ समिती च्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी संतोषराव तायडे यांची नियुक्ती !


नांदुरा.. सद धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट व केंद्राचे संस्थापक अध्यक्ष संतोष राव तायडे लोणवाडीकर यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबविलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने धम्मचक्र परिवर्तन दिनाला नागपूर दीक्षाभूमी ला जाणाऱ्या भीमसेनीकांना दरवर्षी भोजनदान वाटप करत असतात, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महिलांसाठी प्रबोधनाचे मोफत पुस्तक वाटप करत असतात, तसेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भिकू संघास भोजनदान व चीवरदान करत असतात, आणि प्रबोधन शिबिरे, विपश्यना शिबिरे , असे कार्यक्रम ते आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून राबवत असतात या सर्व कार्यक्रमाची दखल घेऊन महाराष्ट्र एनजीओ समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.युवराज येडुरे यांच्या आदेशानुसार अश्विनी कसबे महाराष्ट्र एनजीओ समिती सदस्य व आरती सोनवणे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते दिनांक 16/10/25 संभाजीनगर येथे मराठवाडा विभाग बैठकीत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदाचे नियुक्त पत्र देऊन त्याना सन्मानित करण्यात आले यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संस्था , बहुउद्देशीय मंडळ,, शैक्षणिक संस्था , इतर काही संस्था यांना सी एस आर फंड मिळून देण्याचे हे प्रयत्न करतील बैठकीचे अध्यक्ष म्हणून डॉ. सुनील नागरगोजे मराठवाडा विभागीय अध्यक्ष. तर संपर्कप्रमुख प्रफुल्ल सावंत योगिता पाटील प्रकाश बोदडे तसेच संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते 

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने