मलकापूर / बुलडाणा, दि. २६ नोव्हेंबर २०२५ — नांदुरा-मलकापूर महामार्गावरील बायोडिझेल पंपातील टाकी स्वच्छतेदरम्यान तयार झालेल्या विषारी वायूंमुळे दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी तपासादरम्यान नवे वळण समोर आले आहे.
पंपातील टाकीची स्वच्छता करताना सुरक्षा उपायांचे पालन न केल्यामुळे मजुरांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
तपासाअंती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत रशीदखाँ जमादार यांचे सुपुत्र जमील खाँ रशीदखाँ (४२) यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. नांदुरा पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून त्यांना अटक केली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बायोडिझेल पंपांवरील सुरक्षितता मानकांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास नांदुरा पोलिसांकडून सुरू आहे
टिप्पणी पोस्ट करा