“ रस्ताच अस्तित्वात नाही, बिल मात्र काढले , शासकीय निधीचा गैरवापर – स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक"


मलकापूर:  निपाणा-हरणखेड (ग्रामीण मार्ग क्र. १२९) या रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम आजवर झाले नसतानाही संबंधित विभागाने या रस्त्यासाठी लेखाशिर्ष 3054 अंतर्गत “दुरुस्ती / सुधारणा अंदाजपत्रक" तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात शासन निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करत हरणखेड ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे जनहित तक्रार दाखल केली आहे.
ग्रामस्थ प्रविणकुमार वामनराव राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्याचा समावेश सन 2001-2021 जिल्हा रस्ते विकास योजनेत करण्यात आला होता. शासन निर्णय 16 फेब्रुवारी 2008 नुसार व नंतर 25 ऑक्टोबर 2023 च्या शुद्धीपत्रकानुसार रस्त्याचा क्रमांक ग्रामीण मार्ग क्र. १२९ असा निश्चित करण्यात आला. मात्र आजपर्यंत रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
अस्तित्वात नसलेल्या रस्त्यासाठी "3054" निधीचा वापर करणे हे शासन निर्णय आणि वित्तीय नियमांचे उल्लंघन असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शासन नियमांनुसार "3054 – Roads & Bridges" निधीचा वापर फक्त अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती आणि परिरक्षणासाठीच होतो, तर नवीन रस्ता बांधण्यासाठी "5054 – Capital Outlay on Roads & Bridges" हा निधी वापरायचा असतो.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने