मलकापूर (प्रतिनिधी) - भुसावळकडून अकोल्याकडे मालगाडीच्या जाणाऱ्या एका डब्याचे चाक मलकापूर
स्थानकाजवळ रुळावरून घसरले. मंगळवारी सायंकाळी ५.१० वाजता डाऊन मार्गावर ही घटना घडली. यामुळे अकोल्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक रात्री ८.४५ वाजेपर्यंत ३ तास ३५ मिनिटे बंद होती. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ, मलकापूर, अकोला, शेगाव, जळगाव रेल्वे स्थानकांवर चौकशी केंद्र सुरू करण्यात आले. तसेच मदुराई स्पेशल सुपरफास्ट ही गाडी जळगाव, तर जोधपूर- चेन्नई एक्स्प्रेस भुसावळ जंक्शनवर थांबवण्यात आली होती. आपत्कालीन पथकाने क्रेनचा वापर करून तत्काळ मदतकार्य सुरू केले. यानंतर ८.४५ वाजता मार्गावरील भुसावळ- अकोला वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा